
चीनने जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) मध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात तक्रार केली आहे. हिंदुस्थानाच्या माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) उत्पादनांवरील शुल्क आणि सौर सबसिडी चीनच्या हितांना हानी पोहोचवत आहेत, असे चीनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2025 मध्ये चीनने हिंदुस्थानविरोधात केलेली ही दुसरी तक्रार आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात ईव्ही आणि बॅटरी सबसिडीसंबंधी तक्रार दाखल केली होती. हिंदुस्थानचे शुल्क आणि सबसिडी देशांतर्गत कंपन्यांना फायदा पोहोचवतात, ज्यामुळे चिनी उत्पादनांसाठी अनुचित स्पर्धा निर्माण होते, असे चिनी मंत्रालयाने म्हटलेय.




























































