साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 जानेवारी 2026 ते शनिवार 16 जानेवारी 2026

>> नीलिमा प्रधान

मेष – आत्मविश्वास वाढेल
मेषेच्या दशमेषात शुक्र, सूर्य मंगळ, बुध. कोणत्याही प्रकारच्या टिकेला सामोपचाराने उत्तर द्या. ध्येय गाठता येईल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. धंद्यात गुंतवणूक वाढवा.
शुभ दि. 11, 12

वृषभ – कामात चूक टाळा
वृषभेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य, मंगळ, बुध. सप्ताहाच्या सुरूवातीला विचारांचा, कामांचा गुंता वाढेल. विचलित न होता निर्णय घ्या. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात चांगली बातमी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणा नको. शुभ दि. 14, 15

मिथुन – अहंकार दूर ठेवा
मिथुनेच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य, मंगळ बुध. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. वाद, अहंकार ठेऊ नका. विरोधक टिका करतील. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील.
शुभ दि. 11, 12

कर्क – संधीची वाट पहा
कर्केच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य, मंगळ, बुध. संभ्रम निर्माण करणार्या घटना घडतील. मनावर दडपण येईल. चांगल्या संधीची वाट पहा. कायदा पाळा. नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतप्रदर्शन टाळा.
शुभ दि. 13, 14

सिंह – संयमी कृती हवी
सिंहच्या षष्ठेशात शुक्र, सूर्य, मंगळ, बुध. शारीरिक, मानसिक तणाव वाढेल. संयमी कृती ठेवा. शब्द जपून वापरा. नोकरी टिकवा. अहंकार नको. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अचानक विरोधक वाढतील. सावध रहा.
शुभ दि. 11, 12

कन्या – ध्येय गाठता येईल
कन्येच्या पंचमेषात शुक्र, सूर्य, मंगळ, बुध. मुलांसमवेत सामोपचाराने बोला. कुणाकडून अपेक्षा ठेऊ नका. तुमचे ध्येय गाठता येईल. नोकरीत तत्परता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. यश जिद्दीने मिळवता येईल.
शुभ दि. 11, 12

तूळ – नवे काम मिळेल
तुळेच्या सुखस्थानात शुक्र, रवि, मंगळ, बुध. महत्त्वाची, कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. नोकरीधंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. प्रभाव वाढेल. काम करताना सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकार्य लाभेल.
शुभ दि. 12, 13

वृश्चिक – निर्णय घेताना सावध रहा
वृश्चिकेच्या पराक्रमात शुक्र, रवि, मंगळ, बुध. सप्ताहाच्या सुरूवातीला कोणताही निर्णय निश्चित करू नका. नोकरीधंद्यात नवा विचार कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तारेवरची कसरत होईल. कठीण प्रसंगावर मात कराल.
शुभ दि. 14, 16

धनु – अचानक खर्च उद्भवेल
धनुच्या धनेषात शुक्र, रवि, मंगळ, बुध. अनेक समस्या मार्गी लागतील. तत्परता ठेवा. अचानक खर्च उद्भवेल. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धुद्यातील चूक सुधारा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात झालेले बदल हितावह ठरतील.
 शुभ दि. 11, 12

मकर – प्रकृतीची काळजी घ्या
स्वराशीत शुक्र, रवि, मंगळ, बुध. सप्ताहात तडजोड करावी लागेल. माणसे पवित्रा बदलतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत तडजोड करावी लागेल. धंद्यात टोकाची भूमिका नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ वाढेल.
शुभ दि. 11, 12

कुंभ – व्यवहारात सावध रहा
कुंभेच्या व्ययेशात शुक्र, रवि, मंगळ, बुध. सरळ, सोपी वाटणारी घटना उग्र रूप धारण करेल. संयम ठेवा. कोणत्याही व्यवहारात सावध रहा. नोकरी टिकवा. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव वाढेल.
शुभ दि. 11, 12

मीन – तणाव, वाद टाळा
मीनेच्या एकादशात शुक्र, रवि, मंगळ, बुध. सप्ताहाच्या पूर्वार्धात तणाव, वाद टाळा. नोकरीत नवा विचार कराल. कायदा पाळा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चढउतार झाला तरी लोकप्रियता वाढेल. स्पर्धेत पुढे जाल.
शुभ दि. 14, 15