
नातेवाईकांच्या शोकसभेहून घरी परतत असताना भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि कारच्या जोरदार धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्व महिला आहेत. जखमींमध्ये दोन महिला आणि कार चालकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारमधील आठ महिला राजस्थानमधील लक्ष्मणगढ येथे शोकसभेत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना फतेहपूरजवळ वळणावर कार अनियंत्रित झाली आणि ट्रकला धडकली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन महिलांसह चालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलीस पुढील तपास करत आहेत.



























































