
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी ताडदेवमध्ये वॉर्ड क्रमांक २१५ मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. येथे भाजप कार्यकर्त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप होत आहे.
‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या जवळच्या सहकारी प्रदीप छेडा आणि प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे वाटप सुरू आहे, असा आरोप होत आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये काही गुजराती मतदार भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटत असल्याचा आरोप करताना दिसत आहे. व्हिडीओ दोन महिला भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करताना दिसत आहे. या महिलांनी याविरोधात आवाज उचलताच भाजप कार्यकर्त्यानी तिथून पळ काढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, ताडदेवमधील वॉर्ड क्र २१५ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने किरण बाळसराफ तर भाजपकडून संतोष ढाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत.





























































