IND vs NZ काय पो छे! न्यूझीलंडने कापली टीम इंडियाची पतंग, दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून केला पराभव

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बुधवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्युझीलंडने हिंदुस्थानचा पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीवर आहेत. डेरिल मिचेलच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियाने दिलेले 285 धावांचे लक्ष्य सात गडी राखून पार केले.