
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रगतीची संधी मिळेल
सूर्य, नेपच्यून लाभयोग, बुध प्लुटो युती. अनेक कामांना गती मिळेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. प्रकृती सुधारेल. सप्ताहाच्या शेवटी संयम ठेवा. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 19, 20
वृषभ – काम रेंगाळत ठेऊ नका
रवि, बुध युती, मंगळ हर्षल त्रिकोणयोग. कोणतेही काम रेंगाळत ठेऊ नका. यशाची घोडदौड सुरू होईल. नोकरीधंद्यात वेगाने पुढे जाल. नविन परिचय प्रेरणादायक ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विक्रमी यश मिळेल. शुभ दि. 22, 23
मिथुन – रागावर नियंत्रण ठेवा
बुध, मंगळ युती, सूर्य, प्लुटो युती. कोणतेही काम करताना आत्मविश्वास, राग यावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई नको. कायदा पाळा. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रलोभने टाळा. शुभ दि. 22, 23
कर्क – कामाची प्रशंसा होईल
सूर्य नेपच्यून लाभयोग, सूर्य, बुध युती. कायदा मोडेल असे संभाषण, कृती करणे धोक्याचे. हुशारी, चातुर्य वापरून समस्या सोडवा. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शुभ दि. 19, 24
सिंह – कायद्याची चौकट पाळा
सूर्य बुध युती, चंद्र गुरू त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो प्रलोभनांना बळी पडू नका. रागावर ताबा ठेवा. कायद्याच्या चौकटीत राहून भाष्य, कृती करा. नोकरी टिकवा. धंद्यात दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या टिका होईल. शुभ दि. 21, 22
कन्या – महत्त्वाची कामे करा
शुक्र, प्लुटो युती, सूर्य, चंद्र लाभयोग. क्षुल्लक तणावाकडे लक्ष न देता महत्त्वाची कामे करा. मोठे यश मिळवा. नोकरीत बढती मिळण्याची संधी. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. खरेदी-विक्रीत लाभ. शुभ दि. 19, 22
तूळ – प्रवासात घाई नको
रवि, बुध युती. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. कोणत्यही क्षेत्रातील वाद विकोपाला जाणार नाहीत याकडे लक्ष द्या. प्रवासात घाई नको. सर्वत्र कायदा पाळा. नोकरीत व्याप होतील. धंद्यात तत्पर रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. शुभ दि. 21, 22
वृश्चिक – करार करताना सावध रहा
रवि, नेपच्यून लाभयोग, बुध, प्लुटो युती, आत्मविश्वासात भर पडेल. नविन परिचय होतील. धंद्यात भागीदार निवडताना काळजी घ्या. कर्ज मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर कौतुक होईल. मात्र करार करताना सावध रहा. शुभ दि. 19, 24
धनु – अचानक खर्च उद्भवेल
रवि, बुध युती, मंगळ, नेपच्यून लाभयोग. सप्ताहाच्य सुरूवातीला कटकटी वाढतील. मात्र नंतर कार्य वेगाने पुढे नेता येईल. नोकरीत मोठी संधी मिळेल. धंद्यात जम बसवा. कर्ज मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. शुभ दि. 21, 22
मकर – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
रवि, बुध युती, सूर्य नेपच्यून लाभयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. तुमच्या क्षेत्रातील योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नुकसान टाळा. नोकरीत ओळखी वाढतील. वर्चस्व दिसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठेपणा मिळेल. कठीण कामे कराल. शुभ दि. 22, 23
कुंभ – कामात सतर्क रहा
चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, शनि युती. क्षेत्र कोणतेही असो घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी न जाता विचार करा. निष्काळजीपणा नको. नोकरीच्या कामात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकारयुक्त भाष्य नको. शुभ दि. 23, 24
मीन – मोठे यश मिळवाल
सूर्य, नेपच्यून लाभयोग. रवि, बुध युती. तत्परता व चातुर्याने मोठे यश मिळवाल. परिचय आत्मविश्वास वाढवतील. कामात चूक टाळा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी चर्चा होईल. महत्त्वाच्या कामात तत्पर रहा. शुभ दि. 19, 20

























































