पनवेलमध्ये भाजपच्या धनशक्तीसमोर शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मते; दुसऱ्या क्रमांकावरील शिलेदारांमुळे सत्ताधाऱ्यांना घाम

मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल मध्ये यावेळी जोरदार कमबॅक करत पाच जागांवर दणदणीत विजय मिळवला. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनाही भरपूर मते मिळाली आहेत. समोर सत्ताधारी भाजपची धनशक्ती असताना शिवसेनेच्या १६ उमेदवारांना चार ते पाच हजार इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे निसटता विजय झालेल्या भाजप उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला होता.

पनवेलमध्ये भाजप युती तसेच शिवसेना, काँग्रेस आणि शेकाप, महाविकास आघाडी अशी लढत झाली. यामध्ये भाजपला सर्वाधिक ५५ जागा मिळाल्या असून शिंदे गटाची दोनच जागांवर दांडी गुल झाली. मात्र मागील निवडणुकीत एकाही जागेवर विजयी न झालेल्या शिवसेनेची ‘मशाल’ यंदा धगधगली आणि लीना गरड, मेघना घाडगे-भिसे, उत्तम मोरबेकर, प्रिया गोवारी, रितीक्षा गोवारी हे पाच उमेदवार दमदणीत मताधिक्याने विजयी झाले. तसेच दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या १६ उमेदवारांच्या पदरातदेखील तीन ते पाच हजार इतक्या मतांचे दान पडले आहे.

शिंदे गटाच्या विजयी उमेदवाराचा उन्माद; पराभूत महिला उमेदवाराच्या दारात ठेवले शिलाई मशीन

सत्तेचा गैरवापर आणि धनशक्ती समोर असतानाही शिवसेनेच्या पूजा जाधव, अॅड. समाधान काशीद, रामदास गोवारी, अनिता भोसले, अॅड. बालेश भोजने, सोमनाथ म्हात्रे, प्रशांत नरसाळे यांसह अन्य उमेदवारांचा जवळपास हजार ते पंधराशे मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला आहे. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत भाजपच्या विजयी उमेदवारांना टेन्शन होते.

ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदेंना चेपले; ठाणे, कल्याण वगळता 6 महापालिकांत शिंदेंचा शक्तीपात