
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे आज ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले. नेरूळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार घेत असताना रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
नितीन बोरकर हे मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय होते. त्यांनी ‘दगडाबाईची चाळ’, ‘मी वसंतराव’ सारख्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही कला दिग्दर्शन केले होते. ‘बॉडीगार्ड’, ‘द माईटी हार्ट’, ‘आणि काय हवं’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.































































