
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीमध्ये भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथे आणण्यात आले आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी काटेवाडीत हजारोंच्या संख्येने लोकं जमली असून सर्वत्र अश्रू व आक्रोश करताना लोकं दिसत आहेत. आमचा दादा नाही तर आमचा बाप आज गेला, अशी प्रतिक्रीया लोकांमधून येत आहे.
काटेवाडीत अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जनसागरल लोटला असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत. ”काटेवाडीतल्या प्रत्येक घरात, झाडात दादा आहेत. दादांचं माणसांसोबत झाडांवरही प्रेम आहेत, ते असताना इथलं एकही झाड त्यांनी कधी तोडू दिलं नाही. आज आमच्यासोबत ते देखील पोरके झाले आहेत’, अशी प्रतिक्रीया एका ग्रामस्थाने दिली. तर ”आज दादा गेले म्हणजे बारामतीचा बाप गेला”, असे एकाने म्हटले.
काटेवाडीतील महिला देखील मोठ्या संख्येने अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. आपला दादा गेला, आपला भाऊ गेला असा आक्रोश या महिला करत आहेत. एक महिला दादांना अखेरची राखी बांधण्यासाठी सोबत राखी घेऊन आली आहे.
काटेवाडीत दिली जाणार शासकीय मानवंदना
अजित पवार यांच्यावर
असा झाला अपघात
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंग होत असताना शेतात कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, आगीच्या ज्वाळांमध्ये संपूर्ण विमान जळून खाक झाले. अजितदादा यांना घेऊन जाणारे हे विमान मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी निघाले होते, तर बारामती येथे 8.50 वा. पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान जवळच्या शेतात कोसळले. विमानला आग लागून ते जळून खाक झाले.




























































