
दिंडोशी विधानसभेतील महानगरपालिका वसाहत संतोष नगर, श्रीपृष्ण नगर, नागरी निवारा तसेच म्हाडा वसाहतीमधील रहिवासी अपुऱया व कमी दाबाने होणाऱया पाणीपुरवठय़ामुळे त्रस्त झाले होते. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी 3 लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे येथील हजारो पुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिंडोशी वसाहतीतील परिसर हा जास्त उंचीवर असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथे कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत होता. पाणीपुरवठय़ाची वेळ वाढवूनही समस्या जैसे थेच होती. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, नगरसेवक तुळशीराम शिंदे आणि सुहास वाडकर यांनी गेली तीन वर्षे सातत्याने महापालिका जल अभियंता विभागासोबत पाठपुरावा केला. 4 डिसेंबर 2024 रोजी सहाय्यक पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत प्रस्ताव सादर केला. त्यानंतर 6 जानेवारी रोजी संयुक्त बैठक घेऊन नवीन सहाय्यक टाकी उभारण्याची गरज अधोरेखित करून मंजुरी मिळवली.
शिवसेनेने केली वचनपूर्ती
आमदार सुनील प्रभू यांनी विधासभा तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान येथील नागरिकांना अपुऱया पाणीपुरवठय़ाच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणार असल्याचे जाहीर वचन दिले होते. अखेर दिंडोशीवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली.
ए-1 स्वीट, दिंडोशी वसाहतीजवळील महानगरपालिकेच्या भूखंडावर 3 लक्ष लिटर क्षमतेच्या सहाय्यक पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुनील प्रभू यांच्यासोबत नगरसेवक तुळशीराम शिंदे, सुहास वाडकर, शाखाप्रमुख संदीप जाधव, संपत मोरे, संपत उतेकर आदी उपस्थित होते.



























































