
इंटरनेट चालू करण्यासाठी तुम्ही मोझिला फायरफॉक्सचा ब्राऊझरचा वापर करत असाल तर सावध व्हा. सायबर सुरक्षा एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने सर्व युसर्जसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. मोझिला फायरफॉक्सच्या काही वर्जनमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये घुसू पाहत आहेत. युजर्सनी आपल्या गोपनीयता आणि सुरक्षेसाठी त्वरीत पावले उचलावीत, असे सरकारने म्हटले आहे. ‘सीईआरटी-इन’च्या म्हणण्यानुसार, मॉझिलाच्या प्रोडक्टमध्ये सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळल्या.
कोणते वर्जन धोक्यात
मोझिला फायरफॉक्स किंवा थंडरबर्डचे जुने वर्जन वापरणाऱ्या युजर्सला हॅकिंगचा धोका आहे. तुमची सिस्टम व्रॅश होऊ शकते. जुने वर्जन तत्काळ अपडेट करा. तसे न करणे म्हणजे हॅकर्सला खुलेआम निमंत्रण देणेच आहे.
कसे सुरक्षित ठेवाल…
मोझिलाने सर्व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत याआधीच अपडेट जारी केले आहे. तमाम युजर्सनी मोझिला अपडेट करणे आवश्यक आहे. फोन प्ले किंवा अॅप स्टोरवर जाऊन अपडेट करता येईल. कॉम्प्युटरवर मोझिला वापरणारे युजर्स ब्राऊजर सेटिंगवर जाऊन लेटेस्ट अपडेटेज वर्जन इन्स्टॉल करू शकतील.

























































