Khalapur news – भंगारात गेलेले 5 तोळे सोने परत मिळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुने झालेले कपाट भंगारवाल्याला विकले खरे.. मात्र त्यातील दागिने काढण्यास महिला विसरली. घरात शोधाशोध करूनही दागिने न सापडल्याने ही महिला चांगलीच हादरली. आपले दागिने विकलेल्या कपाटातच गेले की काय अशी शंकेची पाल त्यांच्या मनात चुकचुकली आणि त्या महिलेने तडक भंगारवाल्याकडे धाव घेतली. सुदैवाने हे दागिने कपाटाच्या लॉकरमध्ये आढळून आले. त्यामुळे सावंत कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

खालची खोपोली येथील प्रतीक्षा सावंत यांनी त्यांचे जुने कपाट एका फेरीवाल्याला भंगार म्हणून विकले. मात्र कपाटाच्या लॉकरमध्ये ५ तोळ्यांचे मंगळसूत्र आणि चांदीचे दागिने काढण्यास महिला विसरली. मात्र दुसऱ्या दिवशी प्रतीक्षा यांना दागिन्यांची आठवण झाली असता त्यांनी घरात शोधाशोध केली. मात्र त्यांना दागिने काही सापडले नाहीत. अखेर भंगार म्हणून विकलेल्या कपाट दागिने राहिल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट भंगारवाल्याचे दुकान गाठले.