
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. याच जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण या अहवालात पार्थ पवार यांच्या नावाचा पुठेही उल्लेख नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र अमेडिया पंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील आणि अमेडिया पंपनीला जमीन विक्री करणाऱया शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आल्याचे समजते.
मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी राज्य सरकारने या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या चौकशीचे काम पूर्ण झाले असून सुमारे 100 पानांचा अहवाल पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर होणार आहे.
सर्वच भागीदार दोषी
या चौकशीत समितीसमोर जी कागदपत्रे सादर झाली त्या कागदपत्रांवर पुठेही पार्थ पवार यांची सही नाही. अमेडिया पंपनी ही एलएलपी कायद्यानुसार नोंदली गेली असल्याने पंपनीचे सर्व भागीदार यात दोषी ठरतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. कागदपत्रांवर दिग्विजय पाटील यांची सही असल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच अमेडिया पंपनीला जमीन विकणाऱया शीतल तेजवानी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क माफी घेणाऱया अमेडिया पंपनीकडून 21 कोटी रुपये वसूल करावेत, अशी शिफारस समितीने केली आहे.






























































