
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर ट्रफिक जाम पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘वंदे भारत’ एक्सप्रेस बर्फातून वेगाने धावत आहे. रेल्वे स्टेशनपासून जवळपासच्या सर्व परिसरात जणू बर्फाची चादर अंथरली आहे. या पांढऱ्या शुभ्र बर्फातून ‘वंदे भारत’ सुस्साट वेगाने धावत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर हे स्वित्झर्लँड आहे, असा भास होत आहे, परंतु हे स्वित्झर्लंड नसून कश्मीर आहे. सध्या सोशल मीडियावर याचे ओटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत.
























































