
देशातील सर्वात मोठय़ा आणि सर्वात महाग प्रॉपर्टी बाजारात मुंबई शहराने जानेवारीमध्ये स्टॅम्प डय़ुटी कलेक्शनमध्ये एक नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. महाराष्ट्र रजिस्ट्रेशन महानिरीक्षक (आयजीआर) आणि कंट्रोलर ऑफ स्टॅम्प्सच्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये मुंबईत एकूण 11 हजार 219 प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन झाले आहे. या व्यवहारातून राज्य सरकारला 1 हजार 12 कोटी रुपयांची स्टॅम्प डय़ुटी मिळाली आहे. रजिस्ट्रेशनची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्के कमी आहे, परंतु कमाईमध्ये वार्षिक आधारावर 2 टक्के जास्त आहे.



























































