
अनेकदा वाहतूककोंडी किंवा इतर कारणांमुळे लोकांची ट्रेन सुटते. काही जणांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागतो. अशा वेळी प्रवाशांना काही प्रमाणात पैसे परत मिळू शकतात.
त्यासाठी ‘टीडीआर’ फाईल करावा लागेल. ऑनलाइन तिकीट बुक करणाऱयांसाठी ही प्रक्रिया आहे. ज्यांनी काउंटरवरून तिकीट घेतले आहे, ते काउंटरवरूनच पैसे परत मिळतील.
आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अॅपवर लॉगिन करून ‘माय ट्रान्झॅक्शन्स’मध्ये जावे. तेथे फाईल टीडीआर पर्याय निवडा.
ज्या प्रवासाचा टीडीआर फाईल करायचा आहे, ते तिकीट निवडा, योग्य कारण निवडा आणि टीडीआर फाईल करा.
नियमानुसार तुम्हाला पैसे परत मिळतील.
तुमची ट्रेन नियोजित वेळेपेक्षा 3 तासांपेक्षा जास्त विलंबाने धावत असल्यास अशा वेळी तुम्ही टीडीआर फाईल केल्यास पूर्ण पैसे परत मिळतात.


























































