
तुमच्या पंटेन्टची चोरी झाल्यास कॉपीराईट उल्लंघन कायद्यांतर्गत कारवाई करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी संबंधित पुराव्यांची जमवाजमवी करावी लागेल.
चोरी झालेली सामग्री, ती पुठे वापरली आहे आणि केव्हापासून वापरली जात आहे, याचे पुरावे गोळा करा. म्हणजे स्क्रीनशॉट, यूआरएल इत्याही पुरावे तुमच्याजवळ हवे.
आधी त्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी संपर्प साधून साहित्य काढून टाकण्यास सांगा. एका वकिलाच्या माध्यमातून त्यांना अधिपृत नोटीस पाठवता येईल.
नोटिसीद्वारे चोरी केलेले साहित्य काढून टाकण्याची, नुकसान भरपाईची मागणी करता येते. साहित्य यूटय़ुब, फेसबुकवर असेल तर ‘कॉपीराईट रिमूव्हल’ फॉर्मद्वारे तक्रार नोंदवा.
आधी सांगितलेल्या उपायांनी काम झाले नाही, तर कॉपीराईट कायदा अंतर्गत दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात खटला दाखल करा. पोलीस चोरीचे साहित्य जप्त करू शकतात.





























































