
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढचे दोन दिवस ते रुग्णालयातच राहतील, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व नियमित तपासण्यांसाठी बाबांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून दिली. दुपारच्या सुमारास डॉक्टरांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्यानुसार, शरद पवार यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा सिटीस्पॅनदेखील करण्यात आलेला आहे. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही,’ अशी माहिती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिली.































































