जम्मू कश्मिर विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला तर केंद्राने विचार करावा – ओमर अब्दुल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान ते म्हणाले, केरळचे नाव केंद्र सरकारने केरळम केले आहे. यापुढे जर जम्मू- कश्मिर विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला तर केंद्र सरकारनेही या नावाचा विचार करावा.

ओमर म्हणाले की, केरळचे नाव केरळम झाले आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे नाव बदलण्याबाबत बोलत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू आणि कश्मिर विधानसभा देखील राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडू शकते.

केरळचे नाव केरळम झाल्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता उमर अब्दुल्ला यांनीही केंद्रावर ताशेरे ओढले आहेत.