
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण चांगलाच बिथरला असून इस्रायल आणि अमेरिकेचा सूड घेण्याच्या तयारीत आहेत. इस्रायल-अमेरिकेला धडा शिकवण्याची भाषा इराण करत आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली असून कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई करू असा इशारा त्यांनी इराणला दिला आहे.
इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी मारले गेले. यानंतर खामेनी यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे म्हणत इराणने अमेरिका-इस्रायलचा बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केला. इराणने अमेरिकेवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत कडक शब्दात इशारा दिला.
आज इराणने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. पण त्यांनी असे धाडस न केलेलेच बरे. कारण जर त्यांनी हल्ला केला, तर आम्ही त्यांच्यावर कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई करू, अशी असा इशारा ट्रम्प यांनी दिला.
US President Donald Trump posts on Truth Social, “Iran just stated that they are going to hit very hard today, harder than they have ever hit before. They better not do that, because of they do, we will hit them with a force that has never been seen before…” pic.twitter.com/DvKDuW49ft
— ANI (@ANI) March 1, 2026
इराणने अणू कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याच्या दाव्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ राबवले. इस्रायल-अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांची मुलगी, जावई आणि नातीचाही मृत्यू झाल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे.
























































