
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला. सोमवारी बोयसर येथील एका केमिकल फॅक्टरीत विषारी वायूची गळती झाली. या घटनांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला फटकारले आहे.
A blast at an explosives factory in Nagpur yesterday because “safety measures weren’t followed”… today a gas leak in a chemical unit in Palghar…
We’re engulfed in our own issues that are pulling us down.
Just like the slab from the metro line construction fell on people…… https://t.co/tRwsrVKZyQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 2, 2026
”काल नागपूर येथील एका फॅक्टरीत स्फोट झाला. त्या ठिकाणी सुरक्षेची माणकं पाळली गेली नव्हती हे समोर आलं. आज पालघरमध्ये केमिकल प्लांटमधून विषारी वायूची गळती झाली. आपण आपल्याच समस्यांमध्ये असे गुंतले आहोत की या समस्या आपल्याला खाली खेचत आहेत. मध्यंतरी मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब काही लोकांवर कोसळला. त्यातील मृतांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. आपल्या देशात जीवाला काही किंमत आहे का? प्रशासन आहे तरी कुठे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केला आहे.


























































