हिंदी महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीचा इराणी युद्धनौकेवर हल्ला; 80 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर व हिंदुस्थानच्या किनारपट्टीच्या जवळ एका इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात इराणची ‘आयआरआयएस देना’ (IRIS Dena) ही युद्धनौका समुद्रात बुडाली असून, प्राथमिक माहितीनुसार 80 हून अधिक जण यात ठार झाले आहेत. तर 100 हून अधिक जण बेपत्ता आहेत.

४ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीलंकेच्या दक्षिण भागातील गाले (Galle) शहरापासून सुमारे ४० नॉटिकल मैल दूर ही युद्धनौका असताना त्यावर पाणबुडीतून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाजातून श्रीलंकेच्या नौदलाला Distress Call पाठवण्यात आला होता. श्रीलंकेच्या नौदलाने या घटनेचे त्यानंतर काही वेळातच जहाज समुद्रात बुडाले.

श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्री विजिता हेरथ यांनी दिलेल्या माहितीनुसार बुडणाऱ्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारांसाठी श्रीलंकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून श्रीलंका योग्य ती कारवाई करेल, असे त्या म्हणाल्या.