Iran Israel War – ऑईल व्हेसलरवर ड्रोन हल्ला, मुंबईच्या दीक्षित सोळंकीसह तीन हिंदुस्थानींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण व इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. इस्त्रायल व अमेरिकेकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यात MKD Vyom या ऑईल व्हेसलवर मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईच्या दीक्षित सोळंकीचा (25) देखील समावेश होता.

दीक्षित सोळंकी हा मूळचा दीवचा रहिवासी होता. तो काही महिन्यांपूर्वी मुंबईतील कांदिवली भागात स्थायिक झाला होता. तो ओमान येथे MKD Vyom या ऑईल व्हेसलवर कामाला होता. या घटनेत दीक्षितसोबतच बिहार व राजस्थान येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटावेळी ऑईल व्हेसलवर असलेल्या १६ हिंदुस्थानींसह 25 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र तीन हिंदुस्थानींना वाचवता आले नाही.

दीक्षित सोळंकीच्या निधनावर ओमानमधील हिंदुस्थानी दुतावासाने तीव्र शोक व्यक्त केला आहे. दीक्षितच्या आईचे महिनाभरापूर्वीच निधन झाले होते, आईच्या निधनानंतर तो काही दिवस दिवला होता. आईचे कार्य झाल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वीच तो ओमानला परतला होत. दीक्षितचा मृतदेह बुधवारपर्यंत मुंबईत आणण्यात येणार असून तिथून तो त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.