प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सर, फोटो शेअर करत दिली अपडेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. राजश्रीने स्वत: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

बुधवारी 4 मार्च रोजी राजश्रीने तिचा रुग्णालयातील बेडवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबत तिने एक मोठी पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यात ती सांगते ”मला पहिल्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे हे आई वडिलांना सांगण्याचे धाडस अखेर माझ्यात आले. आता तुम्हाला सर्वांना सांगतेय. नशिबाने खूप लवकर नियमित तपासणीमुळे या आजाराचे लवकर निदान झाले. शेकडो तपासण्या, शस्त्रक्रिया अशी एक रोलर कोस्टर राईड होती. पण खरंच सांगते हे तुमच्या सर्वांचे प्रेमच होतं की मी हे सर्व निभावून नेलं. शस्त्रक्रियेनंतर माझ्या आई वडिलांना पाहिल्यानंतर माझी भीती जाऊन त्याचे रुपांतर धैर्यात झाले. आता सर्वांच्या पाठिंब्यांने मी पुन्हा एकदा जगासमोर यायला तयार आहे. मी बरी होतेय व लवकरच हॉस्पिटलमधून घरी परतणार आहे”, अशी पोस्ट तिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.