IND Vs NZ Final – हायहोल्टेज मेगा फायनल; स्टेडियमच्या आजूबाजूला हजारोंच्या संख्येत पोलीस फौजफाटा, अनेक मार्ग बदलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या (8 मार्च) ICC T20 World Cup 2026 ची फायनल खेळली जाणार आहे. हिंदुस्थानला पाठिंबा दर्शवण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने संपूर्ण देशभरातून नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच स्टेडिमयच्या जवळील अनेक मार्ग सुद्धा बदलण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणारी रोमांचक आणि थरारक फायनल सुरळीत पार पाडावी म्हणून 7 DCP, 10 SP, 25 PI, 78 SI आणि 2000 पोलीस कर्मचारी स्डेयिमच्या परिसरात तैनात करण्यात आल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी दिली. मुंबई ते अहमदाबाद अशी विशेष ट्रेन धावणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अमहदाबाद मेट्रो स्टेशन स्टेडियमवच्या जवळ असून मेट्रो सेवा दिवसभर सुरू राहणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना संपल्यानंतर स्टेडियमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते.

चाहते सुरळीत आपापल्या घरी पुन्हा पोहचावेत यासाठी अहमदाबाद पोलिसांनी कंबर कसली आहे. स्टेडियमच्या आतमध्ये जवळपास 2200 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. म्हणजेच स्टेडियमच्या आत आणि बाहेर असे जवळपास 4 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. तसेच स्टेडियमच्या आजूबाजूला असणारे काही मार्ग बदलण्यात आले असून काही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.