IPL 2026 – हा तर शमीच्या पुनरागमनाचा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या गोलंदाजीच्या रणांगणात पुन्हा एकदा वादळ घोंगावण्याची चाहूल लागली आहे. बुधवारी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना शमीने पहिल्याच सामन्यात धमाका करत आपली एंट्री जोरदार केलीय. हा तर मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचा फक्त ट्रेलर आहे, सिनेमा अजून बाकी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने शमीच्या कामगिरीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.

सनरायझर्स हैदराबादकडून देवाणघेवाणीत 10 कोटींना लखनऊने घेतलेल्या शमीने पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. 2026 हंगामातील पहिल्याच चेंडूवर त्याने के. एल. राहुलचा बळी टिपला आणि आयपीएल इतिहासात अशी किमया करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. दिल्ली पॅपिटल्सविरुद्धचा हा धक्का म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी थेट इशाराच होता.

आकडे साधे, पण प्रभाव जबरदस्त

28 धावांत 1 विकेट हे आकडे साधे वाटतील, पण शमीचा खरा प्रभाव ‘पॉवर प्ले’मध्ये दिसला. अचूक टप्प्यावर टाकलेल्या चेंडूंनी त्याने धावांचा वेग गुदमरवला. राहुलला ‘इनसाइड आऊट’ फटका खेळायला भाग पाडून जाळय़ात अडकवणं, ही शमीची चातुर्यपूर्ण चाल होती.