
मुंबईतील कुरार भागात दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी तीन ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान एटीएसने 12.5 लाख रुपयांची रोकड, अनेक बनावट पासपोर्ट, 9 मोबाईल, एक लॅपटॉप, एक आयपॅड आणि महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. एटीएस टेरर फंडिंगच्या अनुषंगाने देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.

























































