Ashok Kharat Case – खरातविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आणखी 11 तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदू अशोक खरात याला महिलेवरील लैंगिक शोषणाच्या दुसऱ्या गुह्यात आज न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुरुवारी तिसऱया गुह्यात त्याला पुन्हा अटक होणार आहे. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या आणखी अकरा तक्रारी एसआयटीकडे गेल्या आहेत.

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरात अटकेत आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला 24 एप्रिलपर्यंतची न्यायालयीन कोठडी दिली. तिसऱया गुह्यात गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आठ गुन्हे तर आर्थिक फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत, त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.