
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे टेस्लाची पहिली कार मॉडेल वायला लाँच केले होते. या कारची सुरुवातीची किंमत 59.89 लाख रुपये आहे. सप्टेंबरपासून कारची विक्री सुरू करण्यात आली होती.
हिंदुस्थानात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाटय़ाने वाढत असताना जगप्रसिद्ध कंपनी टेस्लाला मात्र हिंदुस्थानात ग्राहक मिळेना झाला आहे. टेस्लाच्या कारला जगभरात जोरदार मागणी असताना हिंदुस्थानच्या ईव्ही मार्पेटमध्ये टेस्लाकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. टेस्लाने मागील 7 महिन्यांत अवघ्या 342 कारची विक्री केली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात टेस्लाने मोठा गाजावाजा करत हिंदुस्थानात इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे पहिली कार मॉडेल वायला लाँच केले होते. या कारची सुरुवातीची किंमत 59.89 लाख रुपये आहे. सप्टेंबरपासून कारची विक्री सुरू करण्यात आली होती.
सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या 7 महिन्यांत टेस्लाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 7 महिन्यांत केवळ 342 कारची विक्री झाली आहे. म्हणजेच महिन्याला सरासरी केवळ 43 कार विकल्या गेल्या आहेत. टेस्लाला प्रतिसाद न मिळण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे कारच्या किमती आहेत. हिंदुस्थानात 60 ते 70 लाख रुपयांच्या जवळपास आहेत. अमेरिकेत विकल्या जाणाऱया कारच्या तुलनेत या किमती 70 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. टेस्लाच्या कारला सध्या हिंदुस्थानात बनवले जात नाही. चीनच्या शांघाय येथील कारखान्यात बनवून विक्रीसाठी हिंदुस्थानात आणले जाते. त्यामुळे कारच्या किमतीत भरमसाट वाढ होते.
2026 मधील सर्वाधिक विक्री झालेल्या कार
- टाटा मोटर्स 78,811
- एमजी मोटर 53,089
- महिंद्रा अँड महिंद्रा 42,721
- ह्युंदाई इंडिया 5,885
- बीवायडी इंडिया 5,361
- किआ इंडिया 3,738
- बीएमडब्ल्यू इंडिया 3,537




























































