
समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री स्वामी साई पेपर सर्व्हिसेसच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परळ येथील टाटा रुग्णालयातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष योगेश नाटेकर, सरचिटणीस अमित डगरे, खजिनदार अनिकेत करमळकर यांनी केले आहे. वेळ ः रविवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. ठिकाण ः बेस्ट अलॉटीज असोसिएशन, डॉ. एस. एस. राव रोड, परळ.

























































