पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट, आठ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan-gas-pipeline-explosion-8-killed-in-khyber-pakhtunkhwa-haripur

पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात गुरुवारी एका औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलीचाही समावेश आहे, अशी माहिती ‘रेस्क्यू ११२२’ च्या अधिकाऱ्याने दिली आहे.

ही घटना हरिपुर जिल्ह्यातील हत्तर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली. ‘रेस्क्यू ११२२’ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड ट्रंक रोडवरील एका ग्राइंडिंग मिलजवळ हा स्फोट झाला. गॅस पाईपलाईनमध्ये झालेल्या या भीषण स्फोटामुळे तिथे मोठी आग लागली होती.