मे महिन्यात बदलणार ईपीएफओचे नियम, पीएफचे पैसे आता थेट यूपीआय खात्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निधी संघटन (ईपीएफओ) आपल्या कोटय़वधी खातेधारकांसाठी मोठा बदल करत आहे. पीएफ काढण्याची पद्धत आता आणखी सोपी होणार आहे. 1 मे पासून किंवा मे महिन्याच्या अखेरपर्यंत यूपीआयद्वारे तत्काळ पीएफ काढता येणार आहे.

ईपीएफओची नवीन डिजिटल सिस्टम सिटीज 2.0 अंतर्गत हे बदल केले जाणार आहेत. यासंबंधीचे काम जवळपास पूर्ण झाले आहेत. मेअखेरपर्यंत यूपीआयद्वारे पैसे काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सध्या पीएफ काढण्यासाठी वेळखाऊ धोरण असल्याने कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागते. परंतु, नवीन सिस्टम आल्यानंतर वाट पाहावी लागणार नाही. यूपीआयद्वारे पैसे काढण्याची मर्यादा असेल. नवीन सुविधा सुरू झाल्यानंतर ईपीएफओ पोर्टलवर किंवा अॅपवर लॉगिन केल्यानंतर एकूण बॅलन्स आणि पैसे काढण्यासंबंधी माहिती दिली जाईल. यानंतर जेवढे पैसे काढायचे असतील तेवढे एन्टर करून आपल्या यूपीआय आयडीला एन्टर करावे लागले.

व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पीएचे पैसे थेट यूपीआय अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. ईपीएफओ लवकरच अधिकृत अॅप उमंग आणि पोर्टलवर यासंबंधीचा नवीन पर्याय देईल.

75 टक्के पीएफ काढता येईल

ईपीएफओच्या नव्या नियमात बदल करण्यात येत आहे. आता कर्मचारी संपूर्ण पीएफ एकाचवेळी काढू शकणार नाही. त्यांना केवळ 75 टक्के पीएफमधील रक्कम काढता येईल. कमीत कमी 25 टक्के रक्कम पीएफच्या खात्यात ठेवावी लागेल. शिक्षण आणि आरोग्यासाठी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत रक्कम काढता येईल. या सुविधेसाठी यूएएन नंबर आधार आणि बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.