पाण्याचे नियोजन चुकतंय नितीन गडकरी यांची खंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात पाण्याची कमतरता नसून नियोजनाचा अभाव आहे, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पाण्याच्या कमतरतेमुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात. हिंदुस्थानात काही ठिकाणी मुबलक पाणी आहे, तर काही भागात दुष्काळ असतो. योग्य नियोजन नसल्याचे हे परिणाम आहेत. नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवनिमित्त जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही खंत बोलून दाखवली.

वॉटर ग्रीड आवश्यक

हायवे व पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीड ही काळाची गरज बनली आहे. जिथे पूर येतात तिथून मोठे कॅनल करून दुष्काळ भागात हे पाणी वळवायला हवे. त्यासाठी मोठे प्रकल्प सरकारने करावेत. मतदारसंघ पातळीवर लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पातळीवर काम करावे, तर गावांनी जलसंधारणाला लोकचळवळ बनवावी. लाखो प्रयत्न होतील, तेव्हाच पाणीटंचाई प्रश्न सुटेल, असा सल्ला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिला.