Photo – पांढऱ्या शुभ्र साडीत गिरीजा ओकचा भुरळ घालणारा लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक म्हणजे गिरीजा ओक-गोडबोले. ज्येष्ठ मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी. गिरीजाने आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर अभिनयाबरोबरच सौंदर्यासाठी ती कायम चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिने नुकत्याच इन्टाग्रामवर शेअर केलेल्या साडीतल्या फोटोंमुळे.  फोटोंमध्ये गिरिजा ओकने अतिशय सुंदर आणि नक्षीदार अशी पांढऱ्या रंगाची कॉटन सिल्क साडी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. साडीवर गळ्यात नाजूक मोत्यांचा हार तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे. आजकाल सोशल मीडियावर ग्लॅमरस आणि बोल्ड लूक्सची चलती असताना, गिरीजाचा हा पारंपरिक, साधा आणि सोज्वळ अंदाज चाहत्यांच्या मनाला अधिक भावला आहे. म्हणूनच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.