Mumbai crime news – भायखळा गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधार गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या अधिकाऱयाने कोलकाता येथून अटक केली. सैफ खान असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. यापूर्वी या गुह्यात सादिक शेख आणि झिशान खान या दोघांना अटक केली होती. गोळीबाराची सैफने सुपारी दिल्याचे उघड झाले.

छोटा शकील टोळीशी संबंधित असलेल्या आसीफ मोहमद इकबाल शेख ऊर्फ आसीफ दाढी याचा मुलगा समीर मोहमद खान आहे. 12 मे रोजी समीर हा डॉकयार्ड रोड येथे आला. तेथे आल्यावर त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. त्यात एक गोळी समीरच्या पायाला लागली. गोळीबार प्रकरणी गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत होते. वरिष्ठ निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकातील नीलेश मोरे, भिसे, काsंकणकर, चव्हाण, दराडे आदींच्या पथकाने तपास करून त्याला अटक केली होती.