
कडाक्याच्या उन्हात गार वारा मिळावा, यासाठी अनेक जण घरी एसी वापरतात. मात्र, एसी अधिक गारवा देत नसेल तर घामाच्या धारा वाहू लागतात.
अशा वेळी तुम्हीच काही गोष्टी तपासून पाहू शकता. सर्वप्रथम थर्मोस्टॅट तपासून पाहा. तापमान तुमच्या गरजेनुसार सेट केले आहे की नाही ते ठरवा.
एअर कंडिशनरच्या बाहेरील युनिट्समध्ये असलेल्या कंडेन्सर कॉइल किंवा कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झालेला असू शकतो. ते तपासून घ्या.
एसी फिल्टरमध्ये घाण साचली असेल तर कूलिंगही कमी होते. एसी फिल्टरमध्ये साचलेल्या घाणीमुळे हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे एसी फिल्टर स्वच्छ करुन घ्या.
तुमचा एसी कोणत्या मोडवर सुरू आहे, हे तपासून पाहा. उन्हाळ्यात तुमचा एसी हा कूल मोडवर असायला हवा. अन्यथा तुम्हाला गार वारा मिळणार नाही.



























































