
केंद्र सरकारने आरोग्याला धोकादायक अशा तब्बल 16 प्रकारच्या ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ (एफडीसी) म्हणजेच मिश्र औषधांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि वितरणावर तत्काळ पूर्ण बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या’च्या कलम 26ए अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. यात पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलीनसह स्कीन केअरच्या 16 औषधांचा समावेश आहे. ही औषधे आजार बरी करण्यासाठी फारशी प्रभावी तर नाहीतच, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
कोणत्या प्रकारच्या औषधांवर बंदी
या बंदीमुळे त्वचाविकार, वेदनाशामक, पोटदुखीवरील, मधुमेहविरोधी आणि प्रतिजैविक अशा विविध प्रकारच्या औषध श्रेणींवर परिणाम झाला आहे. यामध्ये काही कोरफडयुक्त स्किन-केअर उत्पादनांचाही समावेश आहे. पॅरासिटामॉल, अमोक्सिसिलीन आणि स्कीन केअरच्या 16 औषधांचा समावेश यात आहे.
























































