डोळ्यांत चुना गेल्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या 9 वर्षीय मुलीच्या डाव्या डोळ्यात चुना गेल्याने तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिच्यावर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ आली होती. मात्र नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्यावर एकामागोमाग डोळ्यांशी संबंधित आधुनिक पद्धतीच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्याने या निरागस मुलीची दृष्टी परतली आहे. चुन्यामुळे डोळ्यांतील कॉर्निया आणि पांढऱ्या भागाचे प्रचंड नुकसान होते, असे एनआयओ रुग्णालयाचे कन्सल्टन्ट कॅटरॅक्ट, कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. योगेश चौगुले सांगितले.