असं झालं तर… आधार कार्डमध्ये तक्रारी असल्यास……

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधारशी संबंधित काही तक्रार असेल, तर 1947 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा. येथे 24 तास आयव्हीआरएस (IVRS) आणि मदतीसाठी कार्यकारी सहाय्य उपलब्ध असते.

तुमची अडचण लिहून [email protected] वर ईमेल करू शकता किंवा UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन ‘आधार मित्र’ या चॅटबॉटद्वारे उत्तरे मिळवू शकता.

तुम्ही मुंबईतील रहिवासी असाल, तर नजीकच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) किंवा तपशिलातील त्रुटी दुरुस्त करून घेऊ शकता.

UIDAI Grievance Redressal पोर्टलवर जाऊन तक्रार दाखल करता येते. फोन, ई-मेल आणि वेबसाईटशिवाय वापरकर्ते पोस्ट ऑ फिसद्वारेही तक्रार नोंदवू शकता.

या तक्रारीची एक हार्डकॉपी UIDAI च्या मुख्यालयात पाठवावी लागेल. मुख्यालयातून युजर्सला उत्तर पाठवले जाईल. पडताळणी झाल्यानंतर नवीन पत्त्यावर पोस्टाने येईल