
मध्य आणि हार्बर अशा दोन्ही मार्गिकांवर रविवारी मेगाब्लॉक आहे. मेन लाइनवर ठाणे ते कल्याण दरम्यान आणि हार्बर लाइनवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात हार्बरवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल लोकलसेवा पाच तासासाठी बंद राहील.
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बरवर पनवेल-वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी येथून बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या लोकल सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत रद्द राहतील. पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीला येणाऱ्या लोकल सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत रद्द राहणार आहेत.


























































