
लडाखमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित लेह मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीतील धावपटूंनी सहभाग घेत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे प्रमोशन केले, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टीम दि. २० ऑगस्ट रोजी रत्नागिरीहून रवाना झाली होती. सुरत, वडोदरा, गांधीनगर, इंदूर, जयपूर, आग्रा, गाझियाबाद आदी रत्नागिरीशी रेल्वेने जोडलेल्या शहरांमध्ये विविध रनिंग कम्युनिटींना भेटी देत ही टीम लेहमध्ये पोहोचली.
या उपक्रमाचे प्रमुख आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी हे जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या खारदुंग-ला चॅलेंज (७२ किमी) मध्ये सहभागी झाले असून जवळपास ३०० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश आहे. तसेच अभिजीत पड्याळ हे ४२ किमी फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.



























































