
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पाच जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले. अग्नीशमन दल आणि बचाव पथकांकडून घटनास्थळी शोध व बचावकार्य सुरू आहे. मलेशियातील बोर्नियो बेटावरील एका विमानतळाजवळ मंगळवारी ही दुर्घटना घडली. फ्लाइंग डॉक्टर सर्व्हिसचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमधून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पाच जण प्रवास करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सारावाक राज्यात झालेल्या या अपघातातील जीवितहानीबाबत अधिकृत पुष्टी अधिकाऱ्यांनी अद्याप केलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार विमानात एक पायलट आणि मंत्रालयाचे चार कर्मचारी होते. यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा, एका सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याचा आणि दोन परिचारिकांचा समावेश होता, असे मलेशियाचे आरोग्यमंत्री झुल्केफली अहमद यांनी एका निवेदनात सांगितले. परिवहन मंत्रालयाचा हवाई अपघात तपास विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.



























































