
अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये जंगलातील आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान अग्नीशमन दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमधून आगीवर पाणी टाकताना ही दुर्घटना घडली. दोन्ही वैमानिक प्रिसिजन या कंत्राटी विमान कंपनीसाठी काम करत होते.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, येसेमाईट नॅशनल पार्कमध्ये जंगलात आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्नाशमन दलाच्या हेलिकॉप्टरमधून पाणी टाकण्यात येत होते. हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक होते. या मोहिमेदरम्यान, हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून, ग्रेग किंग असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या वैमानिकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


























































