ट्रेंड – ‘मंकेश भाई’चे लाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका मजेशीर व्हिडीओमध्ये एक माकड सलूनमध्ये जाते आणि खुर्चीत बसून न्हाव्याकडून डोक्याचा आणि शरीराचा मसाज घेतेय. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. न्हावीसुद्धा त्याला डोक्याचा आणि शरीराचा मसाज देतोय. हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची दुकानाबाहेर गर्दी जमली आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्याला ‘मंकेश भाई’ असे टोपणनाव दिले आहे. काही जण म्हणतात की, ‘एकही रुपया न देता आलिशान लाड करून घेण्याची कला त्याला माहिती आहे’. इंटरनेटवर त्याला ‘व्हीआयपी ग्राहक’ म्हटले जात आहे. काही जण ‘जय हनुमान’, ‘जय श्री राम’ अशा कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ @DIVYA177KUMARI या इंस्टा आयडीवरून शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 49 हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे.