
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सध्या अंतिम सुनावणी घेतली जात आहे. न्यायालयाने मागील सलग दोन सुनावणी वेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे मंगळवारची सुनावणीही लक्षवेधी ठरणार आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाच्या कार्यतालिकेत 24 व्या क्रमांकावर शिवसेनेचे प्रकरण सूचिबद्ध करण्यात आले आहे. गद्दारी केलेल्या शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे, तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी गद्दार आमदारांना अपात्र न ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. दोन्ही याचिकांवर शिवसेनेतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आता त्यावर शिंदे गटाचे वकील आपली बाजू मांडत आहेत.



























































