राम मंदिरात 70 नव्हे 105 वेळा झाली देणगी चोरी, एसआयटीची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येच्या राम मंदिर लुटीमुळे देशभरात संताप असताना आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम मंदिरात 70 वेळा नव्हे तर तब्बल 105 वेळा चोरी झाली आहे. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये पैद झाली आहे, अशी माहिती विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज सर्वोच्च न्यायालयात दिली.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशा अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर आज सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुएकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एसआयटीचा सद्यस्थिती अहवाल सादर केला. ‘एसआयटीची चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. सीसीटीव्ही, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांचा तपास करून आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे,’ अशी माहिती मेहता यांनी न्यायालयात दिली.

उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या एसआयटीने जून महिन्यात सादर केलेल्या अहवालात 27 एप्रिल ते 5 जूनच्या दरम्यान 70 वेळा मंदिराच्या दानपेटीतून चोरी झाली होती, असे नमूद करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेमलेल्या दुसऱ्या एसआयटीने नवा अहवाल सादर केला आहे. दानपेटीतून 105 वेळा चोरी झाली होती. अटकेत असलेले 8 आरोपी नोटांचे बंडल खिशात आणि बुटांमध्ये लपवताना सीसीटीव्हीत दिसले होते, असे त्यात म्हटले आहे.

25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र

याप्रकरणी 25 सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली. या आरोपपत्रानुसार पुकारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना दिले. गरज भासल्यास पुढील चौकशीचे आदेशही जारी करण्यात येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.