मीरारोडमध्ये आरोग्याचा जागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होरायझन उत्सव मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांचे निरोगी आरोग्य हीच जनसेवा असा सामाजिक संदेश मंडळाच्या वतीने देण्यात आला.

शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजनची पातळी यांसह आवश्यक त्या इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर नागरिकांना मोफत आरोग्यविषयक मार्गदर्शन व आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. दरम्यान मंडळाने नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे आरोग्य तपासणीसोबतच शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाल्या. शिबिरात गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी, मंडळाचे अध्यक्ष पृष्णा दरेकर, सचिव पुष्पम पुमार आणि कोषाध्यक्ष चेतन काते यांनी विशेष मेहनत घेतली.