ओवेसी म्हणतात नवऱ्यांनो, स्वतःच्याच बायकोवर प्रेम करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीवर प्रेम व्यक्त करताना कंजुशी करू नका, नवऱ्यानो स्वतःच्याच बायकोवर प्रेम करा, असा प्रेमळ सल्ला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभेत दिला. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी घरी परतल्यावर दिवसातून दोन ते चार वेळा पत्नीच्या डोळ्यात पाहून ‘‘माझ्या प्रिये, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणावे. यामुळे घरात सुखद वातावरण निर्माण होईल आणि परस्पर प्रेम वाढेल,’’ असे ओवेसी म्हणाले. पती-पत्नीच्या नात्यात प्रेम व्यक्त करण्यास कोणताही संकोच नसावा, असे ओवेसी म्हणाले.