
हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने दे दणादण गोल ठोकत न्यूझीलंडचा 17-1 फरकाने धुव्वा उडवित आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एक रुबाबदार विजय मिळविला. या विजयात हिंदुस्थानच्या तीन खेळाडूंनी गोलची हॅट्ट्रिक साजरी केली.
सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानला तब्बल 19-0 गोल फरकाने लोळवल्यानंतर हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने इंडोनेशियाविरुद्धही गोलांचा पाऊस पाडला. हिंदुस्थानी आघाडीच्या फळीसमोर इंडोनेशियाचा बचाव अक्षरशः निष्प्रभ ठरला. दीपिका, ऋतुजा पिसाळ आणि नवनीत काwर या तीन हिंदुस्थानी खेळाडूंनी हॅट्ट्रिक करीत विजयात मोठा वाटा उचलला. सुनेलिता टोप्पो, लालरेमसियामी आणि साक्षी राणा यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर कर्णधार सलीमा टेटे आणि इशिका यांनी प्रत्येकी एक गोल केला.
पहिल्या सत्रातच 9 गोल
हिंदुस्थानने पहिल्या दोन सत्रांतच सामन्याची दिशा स्पष्ट केली. पहिल्या क्वार्टरमध्ये चार, तर दुसऱया क्वार्टरमध्ये आणखी पाच गोल करत हिंदुस्थानने मध्यंतराला 9-0 अशी भक्कम आघाडी घेतली. तिसऱया सत्रात इंडोनेशियाच्या इन्नेस आदित्यने एकमेव गोल केला; मात्र हिंदुस्थानने त्याच सत्रात पाच गोल करत प्रत्युत्तर दिले. अखेरच्या सत्रात आणखी तीन गोल करत हिंदुस्थानने सामना 17-1 असा खिशात घातला. दीपिकेचा गोलधडाका थांबेनासा झाला आहे. उझबेकिस्तानविरुद्ध आठ गोल केल्यानंतर तिने इंडोनेशियाविरुद्ध आणखी तीन गोल ठोकले. दोन सामन्यांत तिच्या नावावर तब्बल 11 गोल झाले आहेत. या विजयासह हिंदुस्थानी संघ ‘ब’ गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे.

























































