
कोठारे बाहून शहापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला आज सकाळी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल ल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस तीव्र उतार व घाट रस्त्यावरील संरक्षक भिंतीवर बऊन धडकली. या दुर्घटनेत ३० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी १७ जणांना शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हे. बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी उजव्या बाजूला वळवली. जर ही बस डाव्या जूला गेली असती तर थेट दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती.
वाहापूर बस आगारातील एसटी कोठारे या गावात रात्री कामाला होती. ही बस आज सकाळी ९ च्या सुमारास शहापूरकडे निघाली. कोठारे ते अवकळवाडीदरम्यान रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटून बस संरक्षक वर आदळली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मधील प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडू लागले. क प्रवासी तर एकमेकांवर आदळले. त्यात काहींना मार लागला. ३० प्रवासी जखमी झाले असून त्यातील बंना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींची नावे
देऊ पोकळा, करुणा मधे, करण भुतांबरे, हिरा उर्फ वैशाली देसले, मंगळी वीर, धोंडू देसले, शिडू हंबीर, आशा देसले, कमल लखांबरे, भागी पादीर, ज्योती लखांबरे, सपना भगत, फसाबाई देसले, चंद्रकांत जाधव, वैशाली फसाळे, शांता फसाळे, कांचन हिंदोळे अशी जखमींची नावे आहेत.
– शहापूरचे आगार व्यवस्थापक मानसी शेळके यांनी सर्व जखमींना नियमानुसार आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.
– बस अपघातात चालक अनिल साबळे व वाहक राजू आव्हाड यांनाही मुकामार लागला आहे. बसमधील काही ज्येष्ठ नागरिक व महिलादेखील जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शहापूरच्या बस आगारात अनेक भंगार बसेस असून त्याच गाड्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये चालवल्या जातात. या बसेसची देखभाल व दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी नवीकोरी ‘राजमाता जिजाऊ’ बस गोठेघर पुलाखाली नादुरुस्त झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



























































